निलेश राणे पुन्हा निवडणूक लढविण्याच्या “मुड” मध्ये त्यामुळेच पालकमंत्र्यांवर टिका…

2

दिपक केसरकरांचा टोला; विरोधी पक्ष नेते म्हणून फडणवीसांचे स्वागत,त्यात गैर काय…?

सावंतवाडी ता.२७: माजी खासदार निलेश राणे हे पुन्हा निवडणूक लढविण्याच्या मूड मध्ये आहेत.त्यामुळेच ते पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आरोप करीत आहेत.मात्र श्री.सामंत हे तीन वेळा आमदार झाले आहेत.त्यामुळे ते हुशार आहेत,असा टोला आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे लगावला.दरम्यान मुख्यंमंत्री आल्यानंतर तसेच सत्ताधारी पक्षाचे नेते मतदार संघात आल्यानंतर त्या ठीकाणी जाणे गरजेचे होते.मात्र विरोधी पक्ष नेते म्हणून ते स्वागत करण्यासाठी गेले त्यात गैर काय ?,कोणी कोठे जावे ही त्यांची मर्जी,त्यामुळे मी काही बोलू शकत नाही,असेही ते यावेळी म्हणाले.श्री.केसरकर यांनी आज झुमच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते पुढे म्हणाले,आपण आरोग्यमंत्री टोपे यांची भेट घेतली.

0

4