वेंगुर्ले पोलिसांची रात्री अचानक पेट्रोलिंग आणि नाकाबंदी, दारू पार्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले…

2

मास्क न घालता फिरणाऱ्या ७० जणांवर कारवाई; तीन वाहने घेतली ताब्यात…

वेंगुर्ले ता.२७ : शहरात पोलिसांनी सद्या रात्री अचानक पेट्रोलिंग व नाकाबंदी सुरू केली आहे. लॉक डाऊन मुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याचा फायदा घेऊन गुपचूप दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले. दरम्यान गेल्या तीन दिवसात मास्क न घालता फिरणाऱ्या ७० जणांवर पोलिसांनी कारवाई करून १४००० रुपये दंड वसूल केला आहे. तसेच एक चारचाकी आणि दोन दुचाकी यांच्यावर 188 प्रमाणे कारवाई करून गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये आला आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने कारवाई सुरू केली आहे. वेंगुर्ले शहरात मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, मोटर सायकल वरून ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी पोलिसांनीही वेंगुर्ले मध्ये मोहीम हाती घेतली आहे. शासनाने कोरोना ला रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सुरू केली आहे. मात्र तरीही बाजारपेठेत उगाच फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. शहरात ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांकडून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग आणि नाका-बंदी करून तपासणी करण्यात येत आहे. तसेच दिवसभर मास्क न घालता फिरणाऱ्या सत्तर नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, महिला पोलीस वंदना गावकर, पोलीस जी.के. भिसे, एस. एन. परब तसेच पांडुरंग खडपकर, पी. जी. सावंत, एस. एस. पाटील, गौरव परब आदिवया मोहिमेत सहभागी आहेत. तरी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन वेंगुर्ले पोलिसांकडून करण्यात आले आहे.

1

4