कोरोनाग्रस्त रुग्ण व नातेवाईकांची फसवणूक थांबणार…

2

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाकडून रूग्णवाहीकांचे दर निश्चित

सिंधुदुर्गनगरी,ता.२७: कोरोना बाधीत रुग्णांना उपचारा करिता रुग्णालयापर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिकांकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुढील प्रमाणे दर निश्चित केले आहेत. २५ कि.मी. पर्यंत अथवा २ तासांकरिता मारुती व्हॅनसाठी ७५० रुपये, टाटा सुमे, मॅटोडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेल्या वाहनासाठी ९०० रुपये, टाटा ४०७, स्वराज माझजा आदींच्या साठ्यावर बांधणी केलेल्या वाहनांसाठी १ हजार रुपये, आय.सी.यु.अथवा वातानुकुलीत वाहनांसाठी १ हजार २०० रुपये दर असणार आहे.
तसेच प्रति किमी भाडे पुढील प्रमाणे असेल.मारुती व्हॅन,टाटा सुमो मॅटोडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेल्या वाहनासाठी १४ रुपये, टाटा ४०७, स्वराज माझजा आदींच्या साठ्यावर बांधणी केलेल्या वाहनांसाठी २० रुपये, आय.सी.यु. अथवा वातानुकुलीत वाहनांसाठी २४ रुपये प्रति किलोमीटर या प्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक पहिवहन कार्यालयात रुग्णवाहिकेसाठी कंट्रोल रुमची स्थापनाही करण्यात आली आहे. संबंधित कंट्रोल रुम येथे ९३५९७८८३३४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. खाजगी रुग्णवाहिका चालक, मालक यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा मागणी केल्यास उप प्रादेशिक परिहवन कार्यालयातील कंट्रोल रुम येथे नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्र सावंत, उप प्रादेशिक पहिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

6

4