आरवली-सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला

2

अद्याप ओळख पटली नाही ; शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल

वेंगुर्ले,ता.२८: 
तालुक्यातील आरवली – सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर आज शुक्रवार 28 मे रोजी सकाळी एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. याबाबत माहिती मिळताच शिरोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही.
सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर सकाळी एक पुरुष जातीचा मृतदेह दिसून आल्याचे सागरतीर्थ येथील शानू यांनी आबा चीपकर यांना कळविले. चीपकर यांनी शिरोडा येथील सागररक्षक सुरज अमरे यांना बरोबर घेऊन किनाऱ्यावर जाऊन पोलिसांना या मृतदेहा बाबत माहिती दिली. त्यानंतर सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. शिरोडा पोलीस सदर मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाई करणार आहेत.

27

4