तरंदळे उपसरपंच निलेश घाडीगावकर यांचे निधन

2

कणकवली, ता.२८ : तालुक्यातील तरंदळे गावचे उपसरपंच व रिक्षा व्यवसायिक निलेश अशोक घाडीगावकर (वय 38) यांचे काल गुरुवारी निधन झाले. कणकवलीतील खाजगी कोविड सेंटरमध्ये ते उपचारासाठी दाखल झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. निलेश यांच्या निधनाने घाडीगांवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निलेश यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

1

4