अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या दुकानांवर कारवाई

2

कणकवलीत मुख्याधिकाऱ्यांचा अचानक फेरफटका

कणकवली, ता.२८ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कणकवली प्रशासन सतर्क झाले असून आज सकाळी मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी पथकासह पटवर्धन चौक – बाजारपेठ ते ढालकाठी असा फेरफटका मारत अत्यावश्यक सेवेत येत नसणाऱ्या व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई केली.
दरम्यान, नगरपंचायतीच्या पथकामार्फत मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी आज अचानक छापा टाकत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या, मात्र, चालू ठेवलेल्या २ मोबाईल शॉपी, घड्याळ दूकान, सोनार दूकान तसेच कपडा दूकान मालकांना प्रत्येकी १० हजाराच्या दंडाचा दणका दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियम पाळून सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू करण्याची परवानगी असताना या मोबाईल शॉपी मालकांनी नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कणकवलीत एकच खळबळ उडाली आहे. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पो. नि. अजिरुद्दीन मुल्ला व नगरपंचायतीच्या या पथकात रवी महाडेश्वर, संतोष राणे उपस्थित होते. यापुढे देखील दुकान व्यवसायिकांनी व नागरिकांनी कोरोना बाबतचे नियम न पाळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे मुख्याधिकारी अवधुत तावडे सांगितले.

4

4