उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग साठी घेतले महत्वपूर्ण निर्णय

2

अबिद नाईक : भूमिगत विजवाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासह लाइटनींग अरेस्टर उभारणी

कणकवली, ता. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तौक्ते चक्रीवादळ संदर्भात कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात बहुउद्देशीय निवारा शेड, भूमिगत विजवाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासह लाइटनींग अरेस्टर उभारने हे तात्काळ घेतलेले निर्णय घेतले ते कोकणी माणसाच्या फायदयाचे ठरणार, असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे अपरिमित नुकसान झालेले असताना जिल्हावासियांना या निर्णयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी घेतली त्याबद्दल जनतेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचेही नाईक म्हणाले.

3

4