सिंधुदुर्गातील कोरोना काळात कार्यरत शिक्षकांना लसीकरण करा…

2

संजना सावंत; आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिफे यांना दिल्या सूचना…

सिंधुदुर्गनगरी ता.२८: कोरोना काळा मध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक यांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नियुक्त केलेले आहे.जिल्ह्यातील या मोहिमेत कार्यरत शिक्षक देखील सर्व प्रकारची जोखीम पकडून कोरोना तपासणी नाके,रेल्वे स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी कार्यरत आहेत.त्यामुळे संबंधित सेवा बजावत असताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता तातडीने लसीकरण होणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत व उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग राजेंद्र म्हापसेकर यांनी शुक्रवार २८ मे २०२१ पासून जिल्ह्यात वितरित करण्यात येणार्‍या लसीकरण प्रक्रियेमध्ये या कोरोना कालावधीत कार्यरत अंदाजीत ७०० शिक्षकांचा समावेश करून त्यांचे तातडीने लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिफे यांना दिल्या.या सूचना च्या अनुषंगाने डॉक्टर खलीपे यांनी देखील शिक्षकांच्या लसीकरणाचे नियोजन केल्याचे सांगितले.

2

4