पोलिस अधीक्षक, तहसीलदार यांनी घेतला तालुक्यातील कंटेंटमेंट झोनचा आढावा

2

कणकवली, ता.२८ : तालुक्यातील करंजे-सातोसेवाडी, नागवे- खेडेकरवाडी तसेच करंजे येथील तांबे एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूलच्या ठिकाणी असलेल्या कंटेंटमेंट झोनला पोलिस अधीक्षक, तहसीलदार यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सरप्राईज भेटी देत आढावा घेतला.
रात्री साडे दहा नंतर या ठिकाणी भेटी देत उशीरापर्यंत सरप्राईज व्हिजिट केल्याने या ठिकाणांची नेमकी स्थिती काय आहे त्याची स्पॉट व्हिजिट मुळे वस्तुस्थिती निदर्शनास आली. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितिन कटेकर, तहसीलदार आर जे पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, करजे सरपंच मंगेश तळगावकर, ग्रामसेवक वर्षा जाधव, तलाठी तांबूसकर, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्याने स्थानिक ग्रामस्थाकडून देखील आढावा घेतला.

1

4