कणकवली चौकातील रॅपिड टेस्ट मध्ये आढळले १२ कोरोना पॉझिटिव्ह, ७६ जणांची झाली टेस्ट …

2

कणकवली, ता.२८ :  पटवर्धन चौकात आज सकाळपासून रॅपिड टेस्ट सुरु करण्यात आल्या. त्यात ७६ जणांच्या टेस्टमध्ये तब्बल १२ जण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याकरिता आता प्रशासनाने घेतलेली आक्रमक भूमिका पुढील काही दिवस कायम ठेवण्याची गरज आहे.
आज कणकवली पटवर्धन चौकात मिळालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कणकवली सिद्धार्थनगर २, तेलीआळी ३, हरकुळ बु सापळेवाडी १, वरवडे खालची मुस्लिमवाडी १, कलमठ महाजनीनगर ४, साकेडी १असे एकूण १२ जण पॉझिटिव्ह मिळाले. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पथकात समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वी पारकर, गिलबर्ट फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर आदी सहभागी होते. या पथकाने गेल्या दोन दिवसात मेहनत घेत थर्मल स्क्रीनिंग व रॅपिड टेस्ट केल्या.

45

4