विलवडे-फौजदारवाडी येथील फर्निचर व्यावसायिक संतोष मेस्त्री यांचे निधन…

2

बांदा ता.२८: विलवडे-फौजदारवाडी येथील फर्निचर व्यावसायिक संतोष कृष्णा मेस्त्री (वय ४८) यांचे गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले. गेल्या पाच दिवसात संतोष यांच्या मातोश्रीचे व छोट्या भावाचे देखील निधन झाले. आई पाठोपाठ दोन्ही मुलांचे पाच दिवसांच्या फरकाने निधन झाल्याने मेस्त्री कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाच दिवसांपूर्वी आई सुंदरी कृष्णा मेस्त्री (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यानंतर तीन दिवसातच छोटा भाऊ महेश कृष्णा मेस्त्री (वय ४४) याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. तीन दिवसातच घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्याने कुटुंबावर झालेल्या या आघाताने संतोष मेस्त्री यांचा रक्तदाब वाढला. त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना काल रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालविली.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाजवय, पुतणी असा परिवार आहे.

2

4