म्हापण ग्रामपंचायतीला कोरोना प्रतिबंधक साहीत्याची मदत…

2

मुंबईतील किशोर मुसळे चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकारातून उपक्रम…

वेंगुर्ले ता.२८: तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायतीला किशोर मुसळे चॅरीटेबल ट्रस्ट,मुंबई यांच्या वतीने कोविड प्रतिबंधक साहीत्याची मदत देण्यात आली.
किशोर मुसळे चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजसेवी वृत्तीने अनेक वर्षे काम करीत आहे. म्हापण गावातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहीत्याचे वाटप सदर संस्था करीत आली आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर या संस्थेकडून म्हापण गावातील नागरीकांना वितरित करणेसाठी १००० मास्क व १० सॅनिटायझरच्या मोठ्या बाटल्या अशा साहीत्याची मदत देण्यात आली. म्हापण सरपंच श्री. अभय ठाकुर यांनी सदर साहीत्य स्वीकारले. यावेळी म्हापण (प्र) ग्रामसेवक श्रीम. टेमकर, माजी सरपंच श्री. गुरुनाथ मडवळ व सस्थेचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. सदर साहीत्याचे वाटप गावातील गरीब गरजू लोकांना ग्रा.पं. सदस्यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

0

4