हुंबरट गावात कोविड विलगीकरण कक्षाची उभारणी जिल्‍हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते उद्‌घाटन

2

कणकवली, ता.२८ : कणकवली तालुक्‍यात हुंबरट गावात पहिला कोविड ग्राम विलिगीकरण कक्ष स्थापन झाला आहे. त्‍याचे उद्‌घाटन आज जिल्‍हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. हुंबरट शाळा क्र.१ येथे हा कक्ष सुरू झाला आहे. या कक्षाच्या उद्‌घाटन कार्यक्रमावेळी सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, हुंबरट सरपंच अर्चना वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप होळकर, मोहन गुरव, रिया पांचाळ, साक्षी दळवी, अस्मिता घाडीगावकर, ग्रामसेवक वैभव ठाकूर, तसेच तलाठी योजना सापळे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गुरव, सुनिल गुरव, समीर होळकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

1

4