सावंतवाडीत पोलिसांकडून आज सात दुकानदारांवर कारवाई…

2

कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका;गुन्हा दाखल…

सावंतवाडी,ता.२८: शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात दुकानदारांवर आज पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.यात तीन किराणा मालाच्या दुकानांसह बेकरी,चप्पल दुकान,व अन्य दोन दुकानांचा समावेश आहे. दरम्यान संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

0

4