शिरोड्यातील नुकसानग्रस्तांना शिवसेनेने दिला मदतीचा हात…

2

वेंगुर्ले,ता.२८:शिवसेनेच्या वतीने रेडी जिल्हा परिषद मतदार संघात तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शिरोडा येथील आपदग्रस्ताना शिवसेनेचा मदतीचा हात पुढे केला आहे.

शिरोडा येथील रहिवासी श्री सुरज अमरे, श्री हनुमंत गवंडी, श्री उदय आंदुरलेकर, श्री किशोर रेडकर, श्रीमती वॄंदा रेडकर, श्रीमती जया रेडकर, श्री हेमंत रेडकर यांच्या घराचे तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले होते. त्यांना खासदार श्री विनायक राऊत, पालकमंत्री श्री उदय सामंत, आमदार श्री दिपक केसरकर, माजी आमदार श्री शंकर कांबळी, तालुका प्रमुख बाळू (यशवंत)परब, शहर प्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटक सौ.सुकन्या नरसुले व विभाग प्रमुख श्री काशिनाथ नार्वेकर यांच्या वतीने विभाग संघटक सौ.रश्मी डिचोलकर यांचे हस्ते तातडीची मदत करण्यात आली.

3

4