छत्रपती संभाजीराजेंनी राजीनामा देऊ नये…

2

नारायण राणे ; भाजपमध्ये येऊन भूमिका घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल…

मालवण, ता. २८ : मराठा आरक्षण प्रश्‍नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देऊन प्रश्‍न सुटणार नाही. त्यांनी जी मोहिम हाती घेतली ती भाजपमध्ये राहून घेतल्यास नक्कीच आरक्षण लवकर मिळेल. राजीनामा न देता योग्य व्यक्तींना भेटलात ज्यांच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे तर प्रश्‍न सुटू शकतो. त्यामुळे कृपया राजीनामा देऊ नये अशी विनंती खासदार नारायण राणे यांनी छत्रपती संभाजीराजेंना केली.
मराठा आरक्षणाच्या विषयावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत श्री. राणे यांना विचारले असता त्यांनी छत्रपतींनी राजीनामा न देता योग्य व्यक्तीला भेटलात तर लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले.

0

4