कोविड रुग्ण मृतदेह दहनासाठी स्वतंत्र एजन्सी नेमणार…

2

 

दर्शना कासवकर ; १० जम्बो सिलेंडरही तैनात ठेवणार…मालवण : कोविड रुग्ण मयत झाल्यावर मृतदेहाचे योग्य पद्धतीने दहन होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ज्या ठिकाणी अशी गरज होती. त्या ठिकाणी नगरपालिका सफाई कर्मचारी जावून योग्य पद्धतीने दहन करत होते. पालिकेमध्ये मुळातच कमी सफाई कामगार असल्याने शहर स्वच्छतेवर परिणाम होत होता. त्याचप्रमाणे काही पालिका सफाई कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आल्याने याचा विचार करुन कोविड रुग्ण मृतदेह दहनसाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याबाबत स्थायी समितीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य सभापती दर्शना कासवकर यांनी दिली.
मयत कोविड रुग्ण दहनासाठी काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी निविदा भरण्यासाठी मालवण नगरपालिकेकडे संपर्क साधावा. तसेच ज्याना कोविड मृत व्यक्तीचे दहन स्वतः करायचे असेल त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पीपीई किट मागणी करून घेवून जावे. किट मोफत पुरविले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व ऑक्सिजन सिलिंडर मागणीचा विचार करता तत्काळ १० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच गरजेप्रमाणे जादा सिलिंडर खरेदी केले जाणार आहेत. याबाबत निविदा प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहितीही सौ. कासवकर यांनी दिली.

39

4