सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या वतीने “सेवा-सप्ताह”…

2

प्रसन्ना देसाई; मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजन…

वेंगुर्ले,ता.२९: 
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला सात वर्षे पुर्ण करीत आहेत. त्यानिमीत्ताने भाजपा च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा केला जाणार आहे व पुढील सात दिवस विविध लोकोपयोगी सेवाकार्य घेऊन *सेवा सप्ताह* साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अंत्योदयाच्या विविध योजना आणुन समाजाच्या शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानुन विविध लोकाभीमुख योजना कार्यान्वित केल्या. सलग दुसऱ्या वेळी सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला ३० मे रोजी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. सलग सात वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या वेळेच्या या दुसऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या सेवा सप्ताहामध्ये कोवीड काळात सेवाभावी वृत्तीने काम केलेल्यांचा सन्मान, कोवीड योद्ध्यांचा सन्मान, लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना काॅफी व बिस्किटं वाटप, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, जेष्ठ नागरिक सन्मान, दिंव्यांग सेवा इत्यादी सेवाभावी उपक्रम आयोजित करुन मोदी सरकारच्या सप्त वर्षपुर्तीचा आंनंदोस्तव साजरा केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

1

4