कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत प्रशासकीय यंत्रणा “हायअलर्ट”…

2

शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट; अनेकांचे धाबे दणाणले…

सावंतवाडी त्व.२९: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासकीय यंत्रणा आज “हायअलर्ट” झाली आहे.दरम्यान अकरानंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची थेट “रॅपिड टेस्ट” सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,तहसीलदार राजाराम म्हात्रे,पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरु आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.मात्र तरीही नागरिकांमध्ये त्याचे गांभीर्य नाही.त्यामुळे अनेक जण हलगर्जीपणा करत आहेत.याच पार्श्वभूमीवर सकाळी ११ नंतर शहरात विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केली.दरम्यान त्यांची थेट रॅपिड टेस्ट घेण्यात आली.तब्बल तीसहून अधिक जणांना हा दणका देण्यात आला.मात्र सुदैवाने यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.पोलीस प्रशासन व नगरपालिका यांच्या सहकार्यातून ही मोहीम सुरू होती.

29

4