सावंतवाडीत “स्टार न्यूट्रिशन” च्या वतीने सॅनिटायझर व व्हिटॅमिनचे वाटप…

2

फर्नांडिस कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी;पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना दिला लाभ…

सावंतवाडी, ता.२९: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा देणाऱ्या “कोविड योद्ध्यांना” आज येथील “स्टार न्यूट्रिशन” च्या वतीने सॅनिटायझर आणि विटामिन सी,डी व झिंकचे वाटप करण्यात आले.यावेळी शहरात अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ देण्यात आला.याप्रसंगी स्टार न्यूट्रिशनचे प्रमुख रँक्सन फर्नांडिस आणि नेहारिका फर्नांडिस उपस्थित होते.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत.यात आरोग्य प्रशासनासह पोलिस कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोलाचा सहभाग आहे.त्यामुळे अशा कोविड योद्ध्यांची काळजी घेण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला होता.

11

4