कुडाळ-सांगीर्डेवाडीत शेतकर्‍यांना भाजपच्या वतीने भात बियाणांचे वाटप….

2

कुडाळ ता.२९: सांगीर्डेवाडी येथील शेतकऱ्यांना आज भाजपच्या वतीने भात बियाणांचे वाटप करण्यात आले.बुथ अध्यक्ष निलेश परब आणि महिला शहर उपाध्यक्ष सौ.मुक्ती परब यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनायक राणे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, शहराध्यक्ष राकेश कांदे ,महिला शहर अध्यक्ष ममता धुरी आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर शासकीय नियमांचे पालन करून ही सेवा देण्यात आली.यावेळी सांगीर्डेवाडी भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0

4