शिरोडा बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या ३६ जणांची रॅपिड टेस्ट २ पॉझिटिव्ह… 

2

ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलीस यांची संयुक्त मोहीम…

वेंगुर्ले,ता.२९:
तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ येथे अत्यावश्यक कामा शिवाय फिरणाऱ्यां 36 व्यक्तींची आज शनिवारी रॅपिड टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये 2 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले अशी माहिती शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली.
कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये आला आहे. गावागावात कोरोना रुग्ण वाढत आहेत. यावर उपाय योजना करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज शिरोडा बाजारपेठेत ग्रामपंचायत शिरोडा, प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी, पोलीस वीभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम घेण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यावेळी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, ग्रा. पं. सदस्य कौशिक परब, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाला वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे सहकार्य लाभले असे श्री. उगवेकर यांनी सांगितले.

10

4