एच.आर.सी.टी टेस्टसाठी तीन हजाराच्यावर रक्कम स्वीकारणाऱ्या सेंटरवर कारवाई…

2

पालकमंत्र्यांचा इशारा; पूर्ण कुटुंब बाधीत किंवा अपंग ,वृध्दांना होम आयसोलेशनमध्ये सूट…

सावंतवाडी ता.२९:  कोरोना रुग्णांकडून “एच.आर.सी. टी” टेस्टसाठी तीन हजाराच्या वर रक्कम कोणी स्वीकारू नये,आणि तसे आढळून आल्यास संबंधित सेंटरवर तात्काळ कारवाई करण्यात येईल,अशा सूचना वजा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिला.दरम्यान कोरोना बाधित रुग्णांसाठी होम आयसोलेशन बंद असले तरी ज्याचे कुटुंब पूर्णता पॉझिटिव्ह आहे,किंवा घरात वृद्ध किंवा अपंग व्यक्ती अशा प्रकारच्या समस्या आहेत.अशा लोकांना त्यात सूट देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
श्री.सामंत यांनी आज या ठिकाणी झूम अँपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.

8

4