कणकवलीत पोलिस,आरोग्‍य कर्मचाऱ्यांशी तरूणाची अरेरावी…

2

बेशिस्त वर्तन केल्‍या प्रकरणी गुून्हा दाखल करणार; सागर खंडाळगे…

कणकवली, ता.२९ : शहरातील पटवर्धन चौकात आरोग्‍य तपासणी करणाऱे आरोग्‍य पथक आणि पोलिसांशी हुज्‍जत घालणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी दुपारी साडे अकराच्या सुमारास ताब्‍यात घेतले. त्‍याला वैद्यकिय तपासणीसाठी उपजिल्‍हा रूग्‍णालयात नेल्‍यानंतर देखील त्‍याने पोलिसांनी पुन्हा वाद घातला. त्‍यामुळे बेशिस्त वर्तन प्रकरणी त्‍या तरूणावर गुन्हा दाखल केला जाणार असल्‍याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडाळगे यांनी दिली. अजित मनोहर कदम (रा.तरंदळे, बौद्धवाडी) असे त्‍या तरूणाचे नाव आहे
शहरातील पटवर्धन चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची आरोग्‍य तपासणी केली जात आहे. यात दुपारी साडे अकराच्या सुमारास अजित मनोहर कदम या तरूणाने आरोग्‍य तपासणीच्या मुद्दयावरून तेथील आरोग्‍य पथकाशी वाद घातला. त्‍यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे तेथे झाला प्रकार पाहण्यासाठी आले असता, त्‍या तरूणाने खंडागळे यांच्याही अंगावर जात अरेरावीचा प्रयत्‍न केला. पटवर्धन चौकात त्‍याचे बेशिस्त वर्तन सुरूच राहिल्‍याने त्‍याला अधिक तपासासाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी तो मद्यप्राशन करून असल्‍याचे लक्षात आले. दरम्‍यान त्‍याच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्‍यानुसार त्‍याला वैद्यकिय तपासणीसाठी कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात आणण्यात आले. यावेळी त्‍याने तेथे पुन्हा तेथील पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्‍जत घातली. दरम्‍यान आरोग्‍य तपासणीनंतर त्‍याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून त्‍याच्यावर बेशिस्त वर्तन प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्‍याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

6

4