कणकवली आज तीन दुकान व्यावसायिकांवर गुन्हे…

2

कणकवली, ता. २९ : शहरात लॉकडाऊन नियमांचा भंग केल्याप्रकरणी तीन दुकान मालकांवर भा.द.वि. कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सुनीता शॉपिंग सेंटरचे अनिल घाडीगावकर, ओमकार फुटवेअरचे शरद जाधव व शालेय पुस्तक भांडारचे विशाल हर्णे या तिघांवर भादवि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली.
वारंवार सांगून देखील अत्यावश्यक सेवे वेतिरिक्त अनेक दुकाने उघडी असल्या प्रकरणी कालच कणकवली शहरात ४० हजारांची दंडात्मक कारवाई केल्यानंतर आज पुन्हा मुख्याधिकारी अवधूत तावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी शहरात सकाळी फेरफटका मारत अत्यावश्यक शिवाय सुरू असलेल्या दुकान मालकावर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत पोलीस हवालदार कैलास इम्पाळ, नितिन बनसोडे, राकेश चव्हाण, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने, अन्य पोलिस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.

1

4