कणकवलीचे गांधीजी बाबूराव पारगावकर यांचे निधन

2

कणकवली, ता.२९ :  ‘गांधीजी’ या नावानेच परिचित असलेले, कणकवली बाजारपेठ-ढालकाठी येथील रहिवासी आणि कणकवलीतील काही आंदोलनांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा वेशधारण करून ‘कणकवलीचे गांधी’ अशी ओळख असलेले शिवपाल उर्फ बाबूराव महादेव पारगावकर (वय ८५) यांचे आज दुपारी निधन झाले. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन किंवा राष्ट्रीय दिवस साजरे करायचे झाले की त्यात गांधीजींचा वेश धारण करून बाबूराव पारगावकर हे नेहमीच पुढे असायचे. काही वर्षांपूर्वी कणकवलीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले त्या आंदोलनात देखील ते अग्रभागी सहभागी झाले होते. त्यांना ‘गांधीजी’ या नावाने हाक मारली जात असे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

11

4