सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने ५६४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले..

2

आणखी पाच जणांचा मृत्यू ; ४ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरू

सिंधुदुर्ग ता.२९: जिल्ह्यात आज नव्याने ५६४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे .दरम्यान आतापर्यंत १९ हजार ७६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले,तर सद्यस्थितीत ४ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

11

4