सावंतवाडीतील “त्या” अश्लील चित्रफीतीच्या मागे कोण,चौकशी करा…

2

परशुराम उपरकरांची मागणी ; जमिन दलालीतून मिळालेल्या पैशातून प्रकार घडल्याचा आरोप…

सावंतवाडी,ता.२९: तालुक्यातील एका आजी-माजी लोकप्रतिनिधीच्या व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमुळे जिल्ह्याच्या संस्कृतीला काळीमा फासला आहे. त्यामुळे या व्हिडिओची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी मनसे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. दरम्यान जमीन व्यवहाराच्या दलालीतून मिळालेल्या अमाप पैशातून हा प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे याच्या मागे कोण आहेत,याचा शोध घ्या,असे ही उपरकर यांनी म्हटले आहे. परशुराम उपरकर यांनी आज ऑनलाईन माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आजी-माजी महिला व पुरुष लोकप्रतिनिधीच्या अश्लील व्हिडिओ संदर्भात मनसेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी श्री उपरकर म्हणाले,आज जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सावंतवाडी तालुक्यातील हा व्हिडीओ पोचला आहे. एकूणच या प्रकाराने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाले आहे, दुसरीकडे एका महिला लोकप्रतिनिधीच्या बाबत असे प्रकार होत असल्याने भविष्यात महिला राजकारणामध्ये येण्यास घाबरणार आहे, किंबहुना महिलांचे कुटुंबिय राजकारणात पाठविणार नाही, मिळालेल्या माहितीच्या आधारे जमिनीच्या दलालीतून मिळालेल्या पैशाचा हा उन्मत्तपणा असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराच्या मुळाशी जावून सखोल चौकशी करावी,संबंधित पहिल्यावर कोणाचा दबाव होता का,याचीही शहानिशा करावी, त्यासाठी पोलिसांनी सुमोटो अंतर्गत तक्रार दाखल करून यासाठी मनसेचे पदाधिकारी सावंतवाडी पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. श्री उपरकर पुढे म्हणाले, या विषयावरील इतर राजकीय पक्ष गप्प का आहेत,हा संशोधनाचा विषय आहे. मात्र सदर विषय हा सामाजिक झाला असल्याने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यामध्ये कोणीही लक्ष घालू शकतो.याच हेतूने आम्ही यासंदर्भात आवाज उठवणार आहोत.तसेच भविष्यातही जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी मनसेच्या माध्यमातून लोक चळवळ उभारणार आहोत.आज यासंदर्भात आपण पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

7

4