महामार्गावर कंपाऊंड वॉल उभ्या करून पर्यटन स्थळांची माहिती द्या…

The Union Minister for Commerce & Industry, Shri Suresh Prabhakar Prabhu holding a Press Conference on the 3rd meeting of Council for Trade Development and Promotion, in New Delhi on January 08, 2018.
2

खासदार सुरेश प्रभू ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

सावंतवाडी,ता.२९: मुंबई-गोवा महामार्ग वरून जाणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती मिळावी. यासाठी दोन्ही बाजूने कंपाउंड वॉल उभी करून त्या ठिकाणी पर्यटन स्थळाची माहिती आणि छायाचित्रे प्रदर्शित करण्यात यावीत, अशी मागणी खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक संघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर,कार्याध्यक्ष सतीश पाटणकर,सचिव नकुल पार्सेकर ,शोष मीडियाचे प्रमुख किशोर दाभोलकर यांनी या संदर्भात प्रभू ययांचे लक्ष वेधले होते. या संदर्भात प्रभू यांनी केंद्रीय मंत्री गडकरी याना या राष्ट्रीय महामार्गावर पर्यटन स्थळांचे सेल्फी पॉईंट तसेच प्रत्येक १० किलो मीटरवर अत्याधुनिक पद्धतीचे पर्यटन माहिती केंद्र आणि कोकणी मेव्याची विक्री केंदे उभारण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर महामार्गाच्या दोन्ही बाजूस सिंधुदुर्गात ईपलब्ध असलेली फळझाडे लावण्याची विनंति केली आहे. अशा प्रकारे सुविधा उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्गातील बीच,हिस्ट्री,कल्चर,फूड,ऍग्रो,हेल्थ पर्यटनात वाढ होऊन इथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बाजारपेठ आपोआप उपलब्ध होईल. त्या दृष्टीने आपण यात लक्ष घालावे असे प्रभू यांनी म्हटले आहे.या बाबतची माहिती सुरेश प्रभू यांनी कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांना कळविली आहे.

3

4