विलवडे येथे ३२ लाख रुपयांची दारू जप्त…

2

राज्य उत्पादनची कारवाई ; स्विफ्टसह ५८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात…

सावंतवाडी,ता.३०: विलवडे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दारू आणि कारसह ५८ लाख ९ हजाराचा मुद्देमालासह जप्त केला आहे.ही कारवाई काल रात्री दोन वाजता करण्यात आली.
कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालया च्यावतीने ही कारवाई करण्यात आली.गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर कारवाई करण्यात आली आहे. यात २६ लाख ४ हजार रुपये रक्कमेची दारू पकडण्यात आली असून. एकूण ५१ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तर ३२ लाख ५ हजार रुपये रक्कमेची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक एन पी रोटे, दुय्यम निरीक्षक सी एल कदम, जवान सागर चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

3

4