सावंतवाडीत कोरोनाला रोखणारच…!,दुसऱ्या दिवशीही प्रशासन मैदानात…

2

विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले; दंडात्मक कारवाई,रॅपिड टेस्ट सुरू…

सावंतवाडी ता.३०: शहरात
कोरोनाला रोखण्यासाठी आज दुसऱ्यादिवशीही प्रशासन मैदानात उतरले.दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस व पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे.तर संबंधितावर दंडात्मक कारवाई तसेच त्यांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.त्यामुळे पुन्हा एकदा विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कारवाई सत्रामुळे अनेकांना पळताभुई थोडी झाली.पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,मुख्याधिकारी जयंत जावडेकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव,योगेश जाधव आदींसह पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई सुरू आहे.

24

4