सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी निश्‍चितच पाठपुरावा करेन…

2

नारायण राणे ; सावंतवाडीत भाजपच्यावतीने सेवा सप्ताह साजरा…

सावंतवाडी,ता.३०: कोरोनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य प्रशासन यंत्रणा सुधारणे गरजेचे होते,मात्र दुर्दैवाने अनेक त्रुटी राहिल्या त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील,त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करू,असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान सावंतवाडी पालिकेच्यावतीने शहरात व तालुक्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांमुळे लोकांना चांगली सेवा मिळाली, अशा लोकांचा सन्मान करण्याचा पालिकेकडून घेण्यात आलेला उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे.त्यांच्या पाठीशी आम्ही कायम खंबीरपणे उभे राहू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकालाला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने सेवा सप्ताह साजरा होत आहे.या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून आज तालुक्यातील कोरोना योध्दयांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक,नगरपालिका गटनेते राजू बेग,न.प.सभापती सुधीर आडिवरेकर,उदय नाईक,माजी सभापती परीमल नाईक,संदीप कुडतरकर,जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, नगरसेवक आनंद नेवगी,उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर,परिणीती वर्तक आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील व्यक्ती आहेत.देशावर व देशातील जनतेवर त्यांच अपार प्रेम आहे. त्यामुळेच कोरोना काळातील काही घटनांमुळे ते व्यथित व भावूक होतात. पुढारी व नेते अनेक होतात,मात्र देशातील जनतेप्रती आपुलकी व आस्था असणारे मोदींसारखे पंतप्रधान क्वचितच घडतात.मोदींचे काम व कार्य त्यांचा त्याग वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे त्यांच्या सारखा पंतप्रधान आपल्याला लाभला हे आपलं भाग्य असून ते टिकवण हे आपल कर्तव्य आहे,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
राणे पुढे म्हणाले,सत्कार हा व्यक्तीचा होत नसून त्याने केलेल्या कामाचा व कार्याचा गौरव असतो. सावंतवाडीतील डॉक्टर नर्स विविध आरोग्य कर्मचारी व कोरोना काळात ज्यांनी लोकोपयोगी कार्य केले त्या कोरोना योद्ध्यांचे प्रतिनिधी म्हणून आज काही लोकांचा इथे सन्मान करण्यात आला. सत्कार ही प्रेरणा आहे,व यातून अधिक लोकांना असेच किंवा याहून अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल.आज या सत्कार यामागचा हेतू असतो. आज ज्यांचे सत्कार केले त्यांनीही आपलं काम कार्य यापुढेही असंच सुरु ठेवावं अशा शब्दात खा. नारायण राणे यांनी सत्कारमूर्तींचा गौरव केला.
नगराध्यक्ष संजू परब यांनीही अशीच लोकोपयोगी काम करून सावंतवाडी शहर कोरोना मुक्त करण्यासाठी काम करावे,अशा शब्दात त्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

1

4