सिंधुदुर्गात हार्डवेअर व्यावसायिकांकडून वादळग्रस्तची लूट…

2

बाळ कनयाळकर; बाजारभावापेक्षा जास्त दराने विक्री,जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी…

कुडाळ ता.३०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर घर,गोठे,शेतमांगर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान ते दुरुस्त करण्यासाठी धडपड करणाऱ्या नुकसानग्रस्तांची हार्डवेअर दुकान व्यवसायिकांकडून फसवणूक केली जात आहे,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी केला आहे.दरम्यान परिस्थितीचा फायदा घेऊन संबंधितांकडून शप्पर दुरुस्ती साहित्यावर अवाजवी दर आकारले जात आहेत.त्यामुळे अशा व्यवसायिकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी श्री.कनयाळकर यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,तौक्ते वादळामुळे जिल्ह्य़ात घर,गोठे.शेतमांगर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घराचे पञे.गोठ्यांचे पञे.शेतमांगर.तसेच अन्य पञ्यांच्या शेडची छप्परे उडून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.काही घरांवर झाडे उन्मळून पडली आहेत.त्यामुळे घरे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहेत.अशा परिस्थितीत प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंब आपले घर सावरण्यासाठी प्रयत्न करत आहेत.शासनाकडून सुद्धा अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.मात्र पावसाळ्यापूर्वी आपल्या घरांची गोठ्यांची शेतमांगराची दुरूस्ती व्हावी म्हणून कर्जाऊ रक्कम घेऊन सिमेंट,लोखंडी पञे. यासह आवश्यक स्टील साहित्य खरेदी करण्यासाठी नुकसानग्रस्त स्टील व पञे साहित्य व्यावसायिकाकडे जात आहे.दरम्यान या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संबंधित व्यापारी बाजारभावा पेक्षा जादा दराने साहित्य विक्री करत आहेत.हे अशोभनीय आहे.त्यामुळे यावर नियंत्रण आणणे महत्वाचे आहे.
वादळापूर्वी स्टीलचा प्रती किलो दर ५४ रूपये होता तो आता ६५ ते ७० रूपये.JSw सिमेंटचे १० फुटी लांबीच्या पञ्याची किंमत ४०० ते ४५० रूपये होती.ती आता ५५५ ते ५६० रुपये केली आहे.तर अन्य स्टीलचे दर ही दुप्पट करण्यात आले आहेत.त्यामुळे अशा व्यवसायिकांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करा,असे म्हटले आहे.

6

4