सामंतांवर टीका करण्यापूर्वी केणींनी आपली योग्यता तपासावी…

2

राजू परुळेकर ; यापुढे टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ…

मालवण, ता. २९ : सध्या कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी पदरमोड करत रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. सामाजीक भावनेतून त्यांचे हे कार्य सुरू असताना त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी मंदार केणी यांनी आपली योग्यता तपासून पाहावी अशी टीका पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी पत्रकातून केली आहे.
केणी यांनी सामंत यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार श्री. परुळेकर यांनी घेतला आहे. ते म्हणाले, कोविड सेंटरमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांना चांगल्या सुविधा, ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येताच दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून या सुविधा उपलब्ध करून दिल्या. ज्या रुग्णांची हॉस्पीटलची बिल देण्याची परिस्थिती नव्हती त्यांची बिलेही अदा करण्याचे काम केले. यात सत्ताधार्‍यांकडून ज्या अपेक्षा होत्या त्याच त्यांनी मांडल्या. यात कोविडच्या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी हाच त्यांचा उद्देश होता. मात्र शिवसेनेत आपले अस्तित्व दाखविण्यासाठी धडपडणार्‍या मंदार केणी यांना ही बाब न समजल्यानेच त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. सामंत हे आमचे नेते आहेत. सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळे केणींनी सामंतावर टीका करण्यापूर्वी आपली योग्यता तपासूनच यापुढे टीका करावी अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देवू असा इशाराही श्री. परुळेकर यांनी दिला आहे.

1

4