बांद्यात ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक..

2

ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय; लस न घेणाऱ्यांना कोणताही शासकीय दाखला देणार नाही…

बांदा ता.३०: शहरात कोरोनाचा उद्रेक होत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढती आहे. या पार्श्वभूमीवर बांदा शहरातील ४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. शहरातील ४५ वर्षावरील जो नागरिक लसीकरण करणार नाही किंवा टाळाटाळ करेल त्याला ग्रामपंचायतीचा कोणताही शासकीय दाखला देण्यात येणार नसल्याची माहिती सरपंच अक्रम खान यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसात बांदा शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आता ग्रामपंचायत प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी आवाहन करूनही लोक लसीकरणासाठी महत्व देत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ४५ वर्षेवरील सर्वांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून शहरातील ४५ वर्षेवरील वयोगटाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांना यापुढे कोणत्याही योजनेसाठी किंवा वयक्तिक कारणासाठी शासकीय दाखले न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरपंच खान यांनी सांगितले.

5

4