सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ६१ हजार जणांनी घेतला पहिला डोस…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.३०: वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ६१ हजार ६९८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

यामध्ये एकूण ९ हजार ६६८ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ६ हजार ७३४ जणांनी दुसरा डोस घेतला. ८ हजार ६७३ फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर ४ हजार ४७२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षावरील ७० हजार ५३७ व्यक्तींनी पहिला डोस तर २२ हजार ७९७  व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ६० हजार ३६८ नागरिकांनी पहिला डोस तर ७ हजार १७६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १२ हजार ४५२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण २ लाख २ हजार ८७७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

2

4