वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत “कोविड सेंटर” सुरू होणार…

2

सुनील डुबळे; ७ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर व ३ व्हेंटिलेटरची सुविधा…

वेंगुर्ले ता.३०: येथील नुतन उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी सुसज्य असे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात येत असून यासाठी ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड आवश्यकता ओळखून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्फत याठिकाणी ७ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आणि ३ व्हेंटिलेटर तात्काळ देण्यात येणार आहेत. अशी महिती माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी दिली.
याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ मशिनरी व साहित्य मुंबईतून घेउन जाण्यास आमदार दीपक केसरकर याना सांगितले असल्याचेही डुबळे यांनी सांगितले. या साहित्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डूबळे व वेंगुर्ला येथील रहिवासी तथा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विजू गावडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबाबत वेंगुर्लेवासीयांच्या वतीने सुनील डुबळे यांनी उद्योगममंत्री सुभाष देसाई, आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. या कोरोना केअर सेंटर मध्ये उर्वरित आवश्यक सुविधाही मागणी प्रमाणे दिल्या जातील असे श्री विजू गावडे यांनी संगीतले.

4

4