कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना महाविकास आघाडीचा आधार…

2

सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांचा पुढाकार; आर्थिक मदतीसह एका मुलाच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी…

सावंतवाडी ता.३०: कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या “त्या” कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.घरातील कमावता कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने आई-वडिलांविना पोरके झालेल्या त्या मुलांवर पर्यायाने कुटुंबावर मोठे संकट आले होते.मात्र महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत त्या कुटुंबातील एका मुलाची वर्षभराची शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे.
शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत करत दिलासा दिला.तसेच त्या कुटुंबातील एका मुलाच्या एक वर्षाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी देखील महाविकासआघाडी तर्फे घेण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, उपसरपंच काका चराटकर, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठावळे आदी यावेळी उपस्थित होते.

2

4