मालवणात मनसेने केले १०० कुटुंबीयांना धान्यवाटप…

2

छप्पर उडालेल्या घरांनाही पत्रे, कौलांचे वाटप ; मुंबईस्थित पदाधिकार्‍यांचा पुढाकार…

मालवण, ता. ३० : मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांनी पेंडुर, पोईप, विरण, कोळंब, सर्जेकोट, वडाचापाट, मालोंड, मसदे, मसुरे, वेरली या गावातील तसेच शहरातील १०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले.
मालवणात मनसेचे मदत कार्य सुरूच आहे. तोक्ते चक्रीवादळ व कोरोनाची दुसरी लाट यामुळे मालवणात अनेक कुटुंब आर्थिक विवंचनेत आहेत. तालुका व शहरातील नागरिकांसाठी मनसेही सरसावली आहे.
प्रत्येक कुटुंबाला ५ किलो तांदुळ, ४ किलो गहू,१ किलो साखर,१ तेल पिशवी, पाव किलो चहा पावडर,१ मीठ पिशवी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे धान्य वाटप शहर अध्यक्षा भारती वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. वादळामुळे छप्पर उडालेल्या घरांनाही मनसेने पत्रे व कौलांचे वाटप केले आहे.
तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, नितिन खानोलकर, महिला शहर अध्यक्षा भारती वाघ, गोपाळ शेलटकर आदी उपस्थित होते.

0

4