तळेरे येथे चाळीस लाखांचा दारू साठा जप्त..

2

सिंधुदुर्ग एलसीबीची पहाटेची कारवाई;कंटेनरसह दोघांना अटक

कणकवली
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी तळेरे येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्याकडून चाळीस लाखाच्या दारूसह कंटेनर असा 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.संबंधित कंटेनर गोव्याहून नाशिक कडे जात होता
याप्रकरणी चालकासह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तळेरे येथे नाशिक कडे जाणारा आयशर टेम्पो (GJ24 X 0911) च्या हौद्यात गोवा बनावटीच्या दारूचे 357 बॉक्स सापडले. याची किंमत चाळीस लाख 25 हजार 880 रुपये असून एकूण 55 लाख 25 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार प्रकाश कदम, गुरुनाथ कोयंडे, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, रवी इंगळे, संकेत खाड्ये, प्रथमेश गावडे, चंद्रकांत पालकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

11

4