कोविड रुग्णांसाठी कणकवलीत १०० बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र…

2

मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची माहिती : नगराध्यक्ष नगरसेवकांचे ही सहकार्य

कणकवली, ता.३१: कणकवलीत दिवसेंदिवस वाढत असलेले कोविडचे रुग्ण व शासनाकडून गृहविलगीकरण अंशतः बंद करण्यात आल्याच्या अनुषंगाने भगवती मंगल कार्यालय येथे १०० बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र नगरपंचायतमार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे अशी माहिती कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिली.
हे संस्थात्मक विलगीकरण केंद्र लवकरच कोविड रुग्णांच्या सेवेत येणार असून या विलगीकरण केंद्रात कोविड पॉझिटिव्ह असलेले पण कोविडची लक्षणे असलेल्या १०० रुग्णांना एकाच वेळी ठेवता येणार आहे. यामुळे कोविडच्या समूह संसर्गाच्या प्रसाराची गती आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. याकरिता नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेवक यांचेदेखील सहकार्य घेण्यात येत असून, येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यांच्या जेवण, नाष्टाची व्यवस्था त्यांच्या नातेवाईकांनी करायची आहे. मात्र, या रुग्णांना मोफत वायफाय सेवा, योगा मार्गदर्शन व मनोरंजनासाठी टीव्ही ची सोय देखील उपलब्ध असणार असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले. कणकवली नगरपंचायतकडून या संस्थात्मक विलगीकरण केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच हे विलगीकरण केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी खुले होईल अशी माहिती तावडे यांनी दिली.

6

4