१८ ते ४५ वयोगटातील सर्वांनचे लसीकरण त्वरित करावे ; अर्षद बेग…

2

सावंतवाडी,ता.३१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण त्वरित करावे,अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्षद बेग यांनी केली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत पावलेल्या मृतांचे प्रमाण व वयोगट पाहता यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील संख्या जास्त आहे.लसीकरणाचा पहिला डोस घेणाऱ्या १८ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या कमी आहे.भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते.आणि या देशातील तरुण सुरक्षित असायला हवा. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा वर्तमानकाळतील व भविष्याकळातील भारताच्या विकासामध्ये सहभाग पाहता लवकरात-लवकर लसीकरणावरील स्थगिती उठवून लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात यावी,अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे करणार असल्याचे बेग यांनी सांगितले.

0

4