तौक्ते वादळ नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय समिती उद्या जिल्ह्यात…

2

जास्तीत-जास्त भरपाईसाठी जिल्हा भाजप मागणी करणार ; राजन तेली…

सावंतवाडी,ता.३१: तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहे. दरम्यान जिल्हा भाजपच्या माध्यमातून त्यांची भेट घेण्यात येणार असून भरपाईच्या निकषात बदल करून जास्तीत जास्त भरपाई देण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे,अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. सात समिती सदस्य असलेले पथक उद्या जिल्ह्यात दाखल होणार आहे.हे पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.त्यामुळे केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न असतील,असे तेली म्हणाले.

3

4