आंबोलीत उद्यापासून ८ जून पर्यंत कडकडीत बंद…

2

आंबोली,ता.३१: गावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २ ते ८ जूनपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आज येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित गाव कृती समितीचे अध्यक्ष गजानन पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच या कालावधीत दुकाने, हॉटेल चालू राहिल्यास संबंधित दुकानांवर हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,त्याच प्रमाणे संबंधित कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल,असे सर्वानुमते ठरविण्यात आले.या सभेस गाव कृती समिती सद्यस्य ,उपसरपंच श्री.दत्तू नार्वेकर,पोलीस हवालदार दत्ता देसाई,आरोग्य कर्मचारी, तलाठी ग्रा.वि.अधिकारी रतीलाल बहिराम उपस्थित होते.

33

4