सावंतवाडी वनविभागाकडून नानेली वनक्षेत्रात बीजारोपण…

2

उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांची संकल्पना ; वन्य प्राण्यांसाठी उपक्रम….

कुडाळ,ता.३१: येथील माणगाव-नानेली वन क्षेत्रामध्ये सावंतवाडी उपवनरक्षक शहाजी नारनवर यांच्या संकल्पनेतून आज बीजारोपण करण्यात आले. वनक्षेत्रपाल कुडाळ अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वन क्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांना भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाद्य स्वरूपात फळे उपलब्ध व्हावीत या दृष्टीने वन क्षेत्रामध्ये आंबा, फणस, कोकम, व इतर फळझाडे बीज रोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच नानेली प्रज्ञेश धुरी, सुनिल सावंत, वाडोस वनाधिकारी सारिका बाटे, तसेच गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.

0

4