कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या गावात स्वतंत्र कक्ष तर छोट्या गावाने एकत्र यावे…

2

टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आवाहन ; प्रत्येक ग्रामपंचायतीला एक दिवसाची ड्युटी बजाविण्याच्या सूचना…

ओरोस,ता.३१: कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तर छोट्या गावात चार ते पाच गावांनी एकत्र येऊन कक्ष स्थापन करावा,त्यासाठी आवश्यक असलेला निधी १५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात यावा,प्रत्येक ग्रामपंचायतीने एक दिवस ड्युटीची जबाबदारी बजावावी, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष तथा टास्क फोर्सच्या प्रमुख संजना सावंत यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागात टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे.या समित्यांची आज बैठक घेण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत सौ सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती महेंद्र चव्हाण, शर्वाणी गांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, महिला व बाल विकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, यांच्यासह तालूका सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, सहाय्य्यक गटविकास अधिकारी, तालूका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी पराडकर यानी टास्क फोर्सची संकल्पना अध्यक्षा संजना सावंत यांची असल्याचे सांगत आपल्याला टेस्ट संख्या वाढवायची असून बाधित रुग्णाना तात्काळ उपचाराखाली आणून वाढलेला मृत्यु दर कमी करायचा असल्याचे आवाहन केले.

4

4