आरोग्याचे रक्षण हे रोगाच्या उपचारापेक्षा नक्कीच महत्त्वाचे…

2

डॉ.स्वाती गाडगीळ;आडवली हायस्कूल मधील विद्यार्थीनींना मार्गदर्शन..

मालवण,ता.३१: कोणत्याही रोगावर उपचार करण्यापेक्षा आरोग्य राखण्यासाठी नक्कीच कमी पैसे खर्च होतात.त्यामुळे आरोग्याचे रक्षण हे रोगाच्या उपचारापेक्षा नक्कीच जास्त महत्त्वाचे असते,असे प्रतिपादन डॉ.स्वाती गाडगीळ यांनी केले.
दरम्यान आडवलीतील आर.ए. यादव हायस्कूल मधील मुलींना मासिकपाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह निमित्त आरोग्य आणि मासिक पाळीच्या दिवसातील स्वच्छता या विषयावर सौ.गाडगीळ यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलत होत्या.

2

4