खनिकर्म निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६ ॲम्बुलन्स दाखल…

2

जिल्हा परिषद पदाधिका-यांच्या हस्ते लोकार्पण ; पाठपुरावा केल्याने,प्रश्न मार्गी लावल्याचा दावा…

ओरोस,ता.३१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खनिकर्म निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांसाठी आज सहा ॲम्बुलन्स प्राप्त झाल्या.त्याचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.दरम्यान जिल्हा परिषदच्या वारंवारच्या पाठपुराव्यामुळे तब्बल चार वर्षांनी जिल्ह्याला ॲम्बुलन्स उपलब्ध होऊ शकल्या.याचा फायदा आता सर्वसामान्य लोकांना होणार आहे,असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

5

4