कसाल येथील दोघा दुकानदारावर तहसीलदारांची कारवाई,दहा हजाराचा दंड…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.३१: जिल्ह्यामध्ये कोरोना या साथीच्या आजाराचे प्रमाण वाढते आहे.यामुळे सध्या लॉकडाऊन आहे. या लॉकडाउडवून मध्ये जीवनावश्यक वस्तू विक्रेत्या दुकाणांना सकाळी सात ते अकरा यावेळेत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे.मात्र त्यानंतरही ही दुकाने उघडी ठेवल्या प्रकरणी कसाल बाजारपेठेतील २ किराणामाल दुकानदारांना कुडाळ तहसीलदार अमोल फटक यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोना या वैश्विक महामारिने कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र जीवनाश्यक सेवा असलेल्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे.असे असले तरीही काही बाजारपेठांमध्ये किराणामाल,भाजी दुकान आदी उशिरापर्यंत सुरू ठेवली जातात. अशी उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
कुडाळ तालुक्यात अशा दुकानांवर तहसीलदारांच्या मार्फत कडक कारवाई केली जात आहे. कसाल बाजार पेठ मध्ये काही दुकाने उशिरापर्यंत उघडी असतात याची माहिती मिळाल्यावर कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांनी अचानक भेट देत या दुकानांवर कारवाई केली. कसाल बाजरपेठेतील २ किराणा दुकानांवर ही कारवाई केली असून, या दुकांच्या मालकांना प्रत्तेकी १० हजार रुपयांचा दंड बसविन्यात आला आहे.

21

4