दारू वाहतूक प्रकरणी दोडामार्ग येथे चंदगड मधील दोघे ताब्यात

2

सासोली-हेदुस येथे कारवाई; कार व दारूसह ३ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त…

दोडामार्ग/लवू परब,ता.३१: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी चंदगड येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सव्वा लाखाच्या कार सह १ लाख ८६ हजार रुपयाची दारू असा मिळून ३ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सासोली हेदुस येथे करण्यात आली. याप्रकरणी तुकाराम सुपल,वैभव चव्हाण (वय २७) अशी त्या दोघांची नावे आहेत ही कारवाई स्वप्निल पांगम व श्री शिवरकर यांनी केली.

2

4